भ्रुणहत्या..
भ्रुणहत्या..
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
नको ग आई, तू घेऊ माझा बळी,
फुलण्या आधीच, तोडू नको कळी.
होऊ दे सुंदर, ह्या कळीचे फूल,
घाबरू नको, माझी लागता चाहूल.
पोटच्या बाळास,नको मारु तू आई,
आई सारखं नातं, जगातच नाही.
जन्म घेऊ दे मला, वाजव तू टाळी,
कर साजरी तू,माझ्या जन्माची दिवाळी.
आहे ना ग आई, मी तुझचं रुप,
कर लाड थोडा, लाव माया खूप.
वटवृक्ष तू ग आई, तुझी ग मी पालवी,
स्त्रित्वाचा वारसा तुझा, मीच पुढे चालवी.
आई तुझ्या पोटी, जन्म मी घेईन,
सावित्री, जिजाऊ, लक्ष्मी, कल्पना चावला होईन.
माझ्या जन्माचा तुला, होऊ दे आनंद.
ही स्त्री भ्रूणहत्या ,तुच कर बंद.
नको होऊ तू वैरीण,नको जीव माझा घेऊ,
मुलगा मुलगी समान,संदेश जगाला देऊ.
स्त्रि भ्रूणहत्या, स्त्रीनेच थांबवावी,
दिवा वंशाचा नसेल तर, पणती जरूर हवी...!