भरारी...
भरारी...
घेण्या भरारी
बळ पंखात भरावे,
दृढ इच्छाशक्तीने
विहार करीत रहावे...
घेण्या भरारी
संधी ती मिळावी,
पादाक्रांत करावी
क्षेत्र नव- नवी...
घेण्या भरारी
सक्षम तु व्हावे,
जबाबदारीचे भान
तू लिलया पेलावे...
घेण्या भरारी
शक्ती व्हावी प्रदान,
सवाॆॅत्तम बनण्याचा
तुला मिळावा मान...