STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational Others

3  

vaishali vartak

Inspirational Others

भरारी

भरारी

1 min
132

नव आशांचा उदय

उजळेल जग सारे

सदा प्रसन्नता वाटे

वाहे चैतन्याचे वारे


येता रवी राज नभी

उधळले नव रंग

भर जीवनी उल्हास

नित्य कामी होत दंग


पहा पक्षीगण उडे

घेत गगनी *भरारी*

भरुनिया बळ पंखे

देउ मनास उभारी


दिन रोजचाच नवा

करा उत्कषे साजरा

पहा सांजवेळी मग

 दिसे चेहरा हासरा


राहो सारेची सुखात 

होता जीवनी उन्नती 

उजळेल भाग्य तुझे

पहा झालेली प्रगती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational