बहर
बहर
बहर येतोय नव्याने,
सये झाडा आता,
इतक्यात तू अशीगं,
नको ना कुंडी बदलू..!
तुला पाहिजे तर मी,
देतो आणूनी गजरा,
फुले अशी खुडण्याचा,
नको तू घाट घालू..!
किती सुंदर नी नाजूक,
फुले दिसती गोजिरी,
असा तयावरी निर्दयी,
नको ना घाव घालू..!
रम्य पहाट आणि सांजा,
दिल्या तयांनी तुजला,
त्या झाडांना फुलांना,
नको तू शेवटा घालू..!
