बहर प्रितीचा
बहर प्रितीचा
एकटक बघता सखे गं...
नजरेतही धार येईल.
जेव्हा तुझी नि माझी भेट होईल,...
पुन्हा नवी बहार येईल.
उशीर झाला यायला....
रूसून तू बसशील.....
रूसवा तुझा काढल्यावर
पुन्हा बहार येईल.
माळेल मी गजरा केसात तुझ्या
पुन्हा बहार येईल
दरवळता सुगंध मोगऱ्याचा
पुन्हा बहार येईल
हसशील जेव्हा तू
पुन्हा बहार येईल
हातात हात घालून फिरताना
बहारच बहार येईल
भविष्यातील स्वप्ने बघता
पुन्हा बहार येईल
पूर्ण झालेली स्वप्ने जगताना
पुन्हा नवी बहार येईल
हे चराचर सारे बहारमय होईल

