भोग
भोग
आज मुकादमांनी
विठूला बदललं
लांबवर चालणं
रखमाला आलं
छान घडी बसली
लगेच उसकटली
अनवाणी पायाने
झपाझपा चालली
उन्हाळ्याच्या झळा
चटाचटा पोळती
लांब डांबरी वाट
सरतच नव्हती
नशिबाचे भोग हे
भोगायलाच हवे
धन्याला जेवण
द्यायलाच हवे
आई बापाची सय
अश्रूतून टपकली
माया वात्सल्याला
दूर पारखी झाली
कधी संपायचा रस्ता
कधी संपायचे भोग
दाद मागू कुणाकडे
सूरव्या तूच बोल
