STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

भले बुरे दिस येती जाती...

भले बुरे दिस येती जाती...

1 min
199

भले बुरे ते घडुनी गेले

क्षण कणभर सुखाचे

दव ओले आसावाचे

दान मनी विसवुनी गेले

सरली गत वर्षाची ती

छाया पसरली जी राती

जरा विसवल्या क्षणात

वेळी जपली ती नाती

विश्वासाची ती नाळ

निसटू पाहत होती

मरणाची ती भीती

अभेद्य वाटत होती

जरा जरा विसावली

नव्या जुन्या विचाराच्या 

संगतीस ती भारावली

सरली आयुष्याची नांदी

लिहिणार होते जराशी

व्यथा गेल्या सालाची

जग थांबलेल्या वेळेची

आस ती उद्याच्या युगाची

बोल मनीचे येते ओठी

भविष्याचे स्वप्न नयनी

आशा होई पल्लवीत मनी

घे हे ही क्षण जरा जागुनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy