STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

भक्त तुम्ही मीच देव, सम्राटही

भक्त तुम्ही मीच देव, सम्राटही

1 min
233

असा मी ,तसा मी 

वागेन मी कसाही 

कुणाला काय देणं घेणं 

मी तर सौभाग्याच लेणं 


असा मी, तसा मी 

खूबसूरत झाँसा मी 

स्वतःच करीन चोरी

वरतून होईल शिरजोरही 


असा मी ,तसा मी 

हजाराचा चष्मा 

लाखोंचा पेन 

सागरातही प्यासा मी 


असा मी ,तसा मी 

कोटींचा कोट

वेष बदलतो 

टोप्या घालतो तरीही 


असा मी ,तसा मी 

मीच नेता, मी अभिनेता 

मीच वाजवणार , मीच गाणार 

तुम्ही फक्त टाळ्या वाजवणार 


असा मी ,तसा मी 

मर्जीचा मालक मी 

करा हवं ते निशंक 

खाणार अन गाणारही 


असा मी ,तसा मी 

अपयश तुमचे फार 

यश माझ्या पदरात 

मीच तुमचा तारणहार 


असा मी ,तसा मी

फकीर मी बेफिकीर 

मीच तुमचा देव नी

नशिबाची लकीर 


असा मी ,तसा मी 

असेंन मी कसाही 

तुम्ही माझे व्हा गुलाम 

अन फक्त करा सलाम 


असा मी ,तसा मी 

जर कोणी आवाज उठवला 

माझ्याविरुद्ध कट रचला... 

बिलकुल खामोश , खबरदार 


असा मी ,तसा मी 

टाळ्या वाजवा 

थाळ्या वाजवा 

दिवे लावा मी म्हणेन तिथे 


असा मी ,तसा मी 

असेंन मी कसाही 

तुम्ही फक्त म्हणा 

नेता असावा तर असा 


असा मी ,तसा मी 

विकेंन काही, विकत घेईन 

देशहितासाठी असेल सारंकाही 

परदेशात जाईल केंव्हाही... 


असा मी ,तसा मी 

मित्र माझे चार जुने 

तुम्ही फक्तनिवडणुकापुरते 

येत जा बोलावेंन तेंव्हा 


असा मी ,तसा मी 

जसाही असेंन मी

माझ्यासारखा नसेन कुणी 

भक्त तुम्ही मीच देव ,सम्राटही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy