भेटत जा
भेटत जा
धिम्या पावलांनी
ओल्या कच्च रस्त्यानी आलीस
बिंब भावानांचे बिंदूत शोधत आलीस
आणि जशी आलीस तशीच निघूनही गेलीस
झिरपणा-या डोळ्यांना चकवा देऊन गेलीस
परत गेलीस ते पुन्हा न भेटण्यासाठी
आणि तेव्हाच ......
तेव्हा माझ्यातलं आभाळ एकटं एकटं पडलं
उरला सुरला प्रकाश गोळा करत
तो ओला रस्ता नुसताच न्याहळतोय
पण तरीसुद्धा एक सांगू ....
खरंच सांगतोय
अशीच अधूनमधून भेटत जा
गोड गोड स्वप्नात
पावसाच्या थेंबात
सूर्याच्या त्या रंगीबेरंगी किरणात
खळखळणा-या झ-याच्या पाण्यात
विसरून गेलेल्या आठवणीत
कधी ओल्या तर कधी कोरड्या श्वासात
भेटत जा अधूनमधून
कधीतरी धिम्या पावलांनी
तर कधी ओल्या रस्त्यावर
भेटत जा .........
