STORYMIRROR

Meera Bahadure

Romance

3  

Meera Bahadure

Romance

भेटीस तिच्या माझ्या

भेटीस तिच्या माझ्या

1 min
121

भेटीस तिच्या माझ्या

झाले कैक मास

अजुनही वाट पाहतो मी

उभा राहून उंबर्यास


भेट ती काही क्षणाची

होती झुळके सारखी

कधी झाली नजरेस पारखी

शब्द ही थबकले बोलण्यास तीथे

असे झाले कितेक दिस

भेटीस तिच्या माझ्या

झाले कैक मास


आठवण ती होती गुपीत

कधी हॄदयाची धडधड

वाढत होती मनात

तिला विसरण्याचे झाले नाही साहस

भेटीस तिच्या माझ्या झाले कैक मास


आठवणीस पंख फुटले

भेटलो फक्त स्वप्नात

सजवले प्रेमाचे गाव

सकाळ होताच गाव जागा झाला

स्वप्नास माझ्या भेटीपूर्वीच दुर केला

भेटीस तिच्या माझ्या

झाले कैक मास



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance