STORYMIRROR

UMA PATIL

Romance

3  

UMA PATIL

Romance

भेटायला ये सखे

भेटायला ये सखे

1 min
28.3K


हवीहवीशी वाटणारी तू

अचानक नकोशी का झालीस ?

आठवण काढायची नेहमी

आता विसरून का गेलीस ?


मी हवा असायचो तुला

पण आता,

त्याच मला

तू टाळतेस का ?

आपले एकांताचे ते क्षण

सोबतीचे

आठवतात का गं तुला ?

आज त्याच क्षणांना

होत गेलो पारखा...

तुझ्यापासून दूर जात-जात

मी होत गेलो परका...


पुन्हा एकदा पाऊस पडेल

पुन्हा तू गंधाळशील का ?

माझ्या मिठीच्या प्रीतझुल्यात

पुन्हा तू झुलशील का ?



सडकेच्या कडेला

दोघांनी सोबत

बर्फाचा गोळा

काला-खट्टा

खाल्ला होता ना...

तेव्हा तुझे लाल रंगाचे ओठ

बघून माझाही तोल

क्षणभर ढासळला

होताच ना...

तेव्हा तू ही

मला

प्रतिसाद दिला होतासच ना....



दूर-दूर पळून सखे तू

किती दूर गं पळशील ?

स्वप्नात येऊन माझ्या

तू मला किती गं छळशील ?



सुकून गेला चेहरा सारा

सुकून गेले मन

तुझ्या विरहात जगतो

आता,

रात्रीला नाही झोप

दिवसाला नाही चैन...

बघतो जेव्हा

नदीला

तेव्हा तूच दिसतेस मला

या अथांग सागराला

तू कधी येशील

भेटायला ?



कधी तरी भेटायला ये सखे

मन भरून तुला पाहून घेईन

जीवनातील माझं सारं सुख

तुझ्याच ओंजळीत देईल



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance