STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Romance

3  

गोविंद ठोंबरे

Romance

भेट

भेट

1 min
14.5K


अंधार राती हळव्या काळोखात

निजलेल्या शांत मंद-धुंद वाऱ्यात

पावसाच्या खट्याळ अवचित गारव्यात

मनाच्या लहरीत अन् दुपारच्या प्रहरात


कधीही भेट सखे यौवनी मनोहरात

लाजऱ्या भावात अन ह्रदयी विश्वात

स्वप्नं साखर मिठीत अन् मनी सागरात

तुझ्याच शहारलेल्या गुलाबी घरात


कालची भेट तुझी बुडून गेली सुर्यास्तात

आजही मन आशाळते तुझ्या प्रतिबिंबात

वाट काढीत पाऊल फिरते तुझ्या पाऊल खुणात

क्षितीजाच्या दूरही अन् गर्द निळ्या आभाळात


थोडीशीच भेट तू थोडीशीच ये अवकाशात

थोड्या थोड्या शब्दांनी थोड्या भाव कोशात

थोडकेच हास तू थोडकेच गोड गालात

नजरेत सामाव तू नजरेच्या खोल डोहात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance