Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy Classics

3  

Rakesh More

Romance Tragedy Classics

भेट देऊन जा

भेट देऊन जा

1 min
160


तू ये आणि धावती 

भेट देऊन जा 

लवकर नाही तर 

लेट देऊन जा || 0 ||


वाट तुझी बघत 

दिवस काढतोय 

स्वतःच्याच कबरीत 

स्वतःलाच गाढतोय 

कुणाकरवी नकॊ 

थेट देऊन जा 

लवकर नाही तर 

लेट देऊन जा || 1 ||


मागत नाही मुळीच 

मी तुझ्याकडे प्रेम 

करत नाही मुळीच 

मी प्रेमाचा क्लेम 

प्रेम नाही निदान 

हेट देऊन जा 

लवकर नाही तर 

लेट देऊन जा || 2 ||


दोन क्षण फक्त 

बघू दे तूला 

दोन क्षण फक्त 

जगू दे तूला 

शक्य झालं तर 

इंटिमेट देऊन जा 

लवकर नाही तर 

लेट देऊन जा || 3 ||


जास्त वेळ तुझ्याकडे 

मागत मी नाही 

हक्क गाजवून 

वागत मी नाही 

काही क्षण चालेल 

पण ग्रेट देऊन जा 

लवकर नाही तर 

लेट देऊन जा || 4 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance