STORYMIRROR

Sayli Kamble

Inspirational

3  

Sayli Kamble

Inspirational

भेट अनुभवांशी

भेट अनुभवांशी

1 min
216

भेटतात विविध अनुभव जुन्या नव्या व्यक्तींच्या रूपाने

कोणी दिसते त्रासलेले तर कोणी गातेय आनंदाने


माझा मात्र गोंधळ होतो त्या सगळ्यांना पाहून

नकळत स्वत:शी तुलना करू लागते मी न राहवून


आपण यापैकी नक्की कोणत्या प्रकारात मोडतो

पण आपलीच परिस्थिती बेताची म्हणून काही काळ सुखावतो


काही लोक आयुष्यात येऊन निघूनही जातात अवेळी पडणाऱ्या पावसासारखे

परत दृष्टीस पडत नाहीत पण त्यांचे वास्तव्य दरवळत राहते मातीच्या सुगंधासारखे


काही लोक आयुष्यात असतात वर्षानुवर्ष, तरीही खरी ओळख न पटल्यासारखे

तर काही पहिल्या भेटीतच वाटतात जुना ऋणानुबंध असल्यासारखे


काही लोकांमध्ये निरागसपणा हा किती ठासून भरलेला असतो

न जाणो या स्वार्थी दुनियेत त्यांचा कसा निभाव लागतो


काही भलतेच लबाड, पण वावरतात मात्र घेऊन वेगळाच मुखवटा

त्यांचा आरसाही गोंधळून म्हणत असेल, आता दाखवू नेमका चेहरा कुठला


कोणासोबत कसे वागावे हा प्रश्न मला कायम पडतो

तरी आयुष्यात येणारा प्रत्येक जण नक्कीच काहीतरी शिकवून जातो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational