STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy

3.4  

Prashant Shinde

Tragedy

भावपूर्ण श्रद्धांजली..!

भावपूर्ण श्रद्धांजली..!

1 min
30.4K


गणपतीचे गणपतराव झाले

हिंदकेसरी कुस्तीवीर शोभले

लाल मातीचे सोने केले

कोल्हापूराचे नाव तुमच्यामुळे गाजले


आंदळकर घराण्याची शान

मिळून दिलात मोठा मान

उभारिली यशाची मोठी कमान

राखूनी मनाशी इमान


मना मनात इथल्या वसले

आपले मानाचे स्थान

गेलात सणावारी चटका लावून

करतो नमन तुमास वाकून


आदर्श जीवनात दिला घालून

शांत स्वभावाची ओळख कुस्तीवीर

खरे शोभलात नरवीर

गाजले त्रिभुवनात तुम्हामुळे करवीर...!!!


कै. गणपतराव आंदळकरांचे चरणी भावपूर्ण

श्रद्धांजली...!




Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy