भावनांचा विचार
भावनांचा विचार
माझ्या भावनांचा विचार तू का रे करशील
उगाच नमते घेऊन तू का रे हरशील
अजून ही भास होतो पुरुषप्रधान संस्कृतीचा
माज आपला बाजूला ठेवून विचार करशील का तीचा
आईबाप घडवतात तरीही भेद मात्र कायमचा ठेवा
दुजाभाव नसेल जिथे वाटावा तिथे मज हेवा
तिच्या विचारांची चिता जळते सदैव नजरेसमोर
चुकांवर घालून पांघरून समोर उभा असतो चोर
लादून आपल्या मतांचा डोंगर तिच्या भावना मातीमोल
आपल्याच धुंदीत कळत नाही सुटतो का स्वतःचा तोल
