STORYMIRROR

Pavan Pawar

Tragedy

3  

Pavan Pawar

Tragedy

भावना

भावना

1 min
232

डोळ्यात अश्रू माझ्या, रे भाव हे कुणाचे,

जिंकू जग प्रेमाने, शिकवण ही बुद्धाची

डोक्यात आहेत, अनैतिक विचार,

अराजकीय वृत्तीला, देऊ साक्ष मी कुणाची


जीवन निराधार दिसते, कल्पना भ्रमाची,

तथ्य नाही कळतं, नजर ही तीमिराची

नाते जपले प्रेमाने, गाठ ही धाग्याची

डोळ्यात अश्रू माझ्या, रे भाव हे कुणाचे


विश्वास नाही राहतं आता रक्तावरी,

प्रेमाचे प्रतिक दिसते, न्यायालयीन पायरी

कसा संबंध सांगावा, मिटला मन कागदाचे,

डोळ्यात अश्रू माझ्या, रे भाव हे कुणाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy