STORYMIRROR

Vasudha Naik

Romance Others

3  

Vasudha Naik

Romance Others

भावगीत

भावगीत

1 min
283

विषय-हे भाव अंतरीचे


हे भाव अंतरीचे सजणा तुला कळावे

प्रेमात फुलावे सजणीस ना विसरावे॥धृ॥


प्रेमाचे गीत माझ्या ओठांवरी सख्या आले

जीवनी धुंद व्हावे, मोदास उधाण यावे

सजणाने सजणीला प्रीतीत मनी स्मरावे ॥१॥


आठवात सजणाच्या मिलनाची ओढ हवी

हृदयांतरी मिलनाची आतुरता ही हवी

मनी मिलनाचे श्वास एकांती उमटावे ॥२॥


शब्द कुपीतले ओठांवरी तुझ्या फुलावे

गुज अंतराचे हे शब्दरूपात न्हावे

पाव्यातील शब्द सूर आसमंती गुंजावे ॥३॥


मिलनाच्या काव्यलहरी किणकिणल्या

एकांतवासात दोघात उफाळून फुलल्या

प्रीतलहरींनो पावसाप्रती बरसावे ॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance