भाव माझ्या अंतरीचा
भाव माझ्या अंतरीचा
कळेल का सखे,कधी तुला,
भाव माझ्या अंतरीचा....
साश्रूनयनांनी संचित होत,
ओलावलेल्या पापणीचा...
लागता उचकी आठवण येते,
तूच साठवणीत असताना...
विसरेन कशी प्रीत आपुली,
तू कधीच विस्मरणात नसताना...
तुझेच नाव सदा ओठांवर,
ह्रदयात तू वसताना...
आहेस माझ्या रोमारोमांत,
भाव प्रेमाचे जपताना....
खरंच,तुझ्यावरील प्रेमाखातर,
म्हणशील तसेच करणार...
हातून माझ्या त्या प्रेमाची,
प्रतारणा नाहीच कधी घडणार.....
तुला मिळवावे म्हणून मी,
नाही करत नशिबाशी भांडण...
मग, का देतेस सखे मला असे हे,
प्रेमभंगाचे सप्रेम आंदण...!!

