STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

भास

भास

1 min
188

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  जळी,स्थळी,मनी,स्वप्नी

  भास प्रिया तुझाच होतो,

  सहवासाचा अर्थ आगतिक

  मनास स्पर्शून जातो....


  मनातल्या परीघात जपली

  रूबाबदार तुझीच छबी,

  जन्मोजन्मी साथ मिळावी

  हाती प्रेमपुष्प घेऊन उभी...


  भास असे अबोल तुझे

  एकटीच गाली हसते,

  स्वप्नातल्या तुझ्या रूपांत

  पुन्हा नव्याने हरवते...


  होतात मला क्षणोक्षणी

  तुजही का होतात भास,

  त्यागून स्वप्ननगरी आता

  भेटण्याची लागली आस..

🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational