Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Tragedy

2  

Chandan Pawar

Tragedy

भारतमाता म्हणाली

भारतमाता म्हणाली

1 min
465


" भारतमाता माता की जय "

तुम्ही जयजयकार करता ;

बेगडी देशप्रेमाचा आव

आणून खोटे गोडवे गाता .


आजवर बलात्काऱ्याप्रमाणे

जीवघेणे प्रहार सोसतेय ;

होय , तीच भारतमाता

आज तुम्हांला विनवतेय .


जाती- धर्माच कडवं बीज

पेरून मला नपुंसक केलं ;

माझं नैसर्गिक सौंदर्य

तेव्हाच तुम्ही ओरबाडलं .


माझ्या सुंदर देहावर

हत्या- हिंसेचं नांगर चालवलं ;

दंगली- कत्तली घडवून

मला वांझोटी बनवलं .


बलात्कार- स्त्रीभ्रूण हत्येने

निष्पापांना वैकुंठी पाठवलं ;

"जगपोशिंदा" बळीराजाला

आत्महत्येला भाग पाडलं .


भ्रष्टाचार, महागाई, बेकरीने

मला क्षणोक्षणी नोचलं ;

तुमच्या स्वार्थी राजकारणाने

माझं " वस्त्रहरण " झालं .


माझ्या अब्रू-इज्जतीची

लूट थांबवा आता ;

आर्त करूण साद

घाली भारतमाता .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy