भारतभूची कीर्ती
भारतभूची कीर्ती
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दोन शब्द
रक्ताचे पौलाद बनवु तुझीया रक्षणासाठी,
ओवाळून टाकू जिवाला अभेद्य सीमां वरती,
लाखो गनिमास धाडू नर्काच्या त्या घरती ,
शब्दच नाही मुखी आता कशी गाऊ भारतभूची कीर्ती
रक्त रंजित इतिहास आठवा शूर प्रखर तेजाचा,
नभी उठविल्या प्रज्वलीत ज्वाला कित्येक यशोगाथा,
पावित्र्य जपूनी सामर्थ्याने स्थापु शांती युगती,
शब्दच नाही मुखी आता कशी गाऊ भारतभूची कीर्ती
जात, धर्म ,पंथ जरी वेगळे तरी अतूट ऐसी एकी,
सर्वस्व त्यागुनी संभाळु हा स्वाभिमान जगती ,
नवतरुण शक्तिशाली पण अतुल्य आमची नेकी,
शब्दच नाही मुखी आता कशी गाऊ भारतभूची कीर्ती
भाग्य अन दैव हवे जन्मलो या भारत भुमी,
प्रत्येक श्वास या देहाचा असे उदार तुझ्यावरती,
तुझ्या सेवेत रक्त झिजवु करु देहाची माती,
शब्दच नाही मुखी आता कशी गाऊ भारतभूची कीर्ती
सहस्र कोटी नमन तुला अनोखी तुझी ती ख्याती
शब्दच नाही मुखी आता कशी गाऊ भारतभूची कीर्ती
जय हिंद
जय भारत