भारत - एक महाशक्तीशाली राष्ट्र
भारत - एक महाशक्तीशाली राष्ट्र
नटला देश आपुला विविधतेने
अभिमान वाटतो प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा
अधिकार समतेचे दिले राज्यघटनेने
आपणच चालवू वारसा पुढे परंपरेचा
तिरंगा ही आपुली शान
आपला झेंडा फडकतो संपूर्ण विश्वामध्ये
राष्ट्रगीत गाताच उंचावते मान अभिमानाने
असून विविधता जाती-धर्मांमध्ये एकता आहे सर्वांमध्ये
अनोखी आपली क्रांती
झाले कित्येक शहीद आपल्या मातीसाठी
विविधता असूनही आपल्यात नांदते शांती
अभिमानाने वाटते प्रत्येकाला करावे काहीतरी आपल्या देशासाठी
जेव्हा पाहतो जवानाला, छाती फुगून
येते
इथल्या किसानालाही वाटतो स्वाभिमान
इथे प्रत्येकाला प्रत्येकाचे स्वातंत्र्य मिळते
अतूट बंधनांमुळे वृद्धांनाही वाटतो सन्मान
हिरवीगार आपली निसर्गसृष्टी
आपली मायभूमीच आहे रममाण
जेव्हा पाहतो कोणी नाहून निघती दृष्टी
निसर्गाप्रती प्रत्येक भारतीयाला आहे कर्तव्याची जाण
जगभर शिकवल्या जातात आपल्या पराक्रमाच्या गाथा
खरंच आपल्या देशाची किमया जगात नावारूपाला आली
परकीय लोकांनाही वाटते टेकवावा आपल्या संस्कृतीपुढे माथा
खरोखरच जगात नावारूपाला आहे आपला भारत एक राष्ट्र महाशक्तिशाली