भारत एक भावना मनाची
भारत एक भावना मनाची
भारत हे फक्त नाही राष्ट्र
बहुजनांनी घेतले आहेत कष्ट
सांडिले रूधिर लक्षानूलक्ष
न केला विचार होताना भक्ष
विविधतेने नटलेले हे साम्राज्य
ज्यावर करू पाहिले बहुजणांनी राज्य
पदरी आली निराशा आले जेव्हा स्वराज्य
त्याही नंतर लढले वीर करण्या स्वतंत्र भारत राज्य
खूप ऐकिवात होते भले भले ही जाणून होते
सोन्याचा धूर एके काळी या धरतीवर निघत होते..
सगळ्यांना सामावून इथे हजारो जन राहत होते
आनंदाने गोडीगुलाबीने सगळे नांदत होते
दूधात पडले जणू भरमसाठ मीठ
विस्कटली घडी जी कधीच नव्हती नीट
वेगळे घर मांडून केला त्याचा थाट
सुखी नाही हौशी होण्याचा बसला फटका जबराट
माझ्या घराची शैली निराळी
प्रत्येकाला आश्रय देई वेळोवेळी
धूर्त कपटी अविश्वास याची मांदियाळी
तेव्हा देशभक्त त्याला शिक्षा करी तेव्हा त्याचे नशीब उजळी
भारतभू साठी प्राण त्यागून तो मरण करी जवळी
