खूप प्रेम करते तुझ्यावर
खूप प्रेम करते तुझ्यावर
खूपदा वाटत रहातं
मन मोकळे करावे
सारे काही सांगून टाकावे
ओठांआड असलेले शब्द सोडून द्यावे
शराप्रमाणे तुझ्या मनात ते रुतावे
मला तू साजना समजून घ्यावे
मनातल्या भावनांना उमजून घ्यावे
मज कुशीत घेऊनी शांत निजवावे
तुझ्या प्रीतीच्या वर्षावात तू मला भिजवावे
तुझ्या आठवणीत मन कमल फुलावे
तुझ्या प्रीतीत मी बावरे व्हावे
जन्मोजन्मी तूच मला मिळावे
हेच मागणे मी तुजसाठी मागावे..
तू उंच शिखरा स्पर्शावे

