विठू माऊली
विठू माऊली
1 min
48
नमन माझे विठूराया
मी आलो तुला भेटाया
पाऊसाची तमा नाही जीवा या
समक्ष तुला पाहता त्रास होतो विसराया
तुझी प्रसन्न मूर्ती देवा
पाहूनी वाटतो हेवा
दर्शन व्हावे तुझे केव्हा
हिच आस लागते शहरी असतो तेव्हा
तू आमचा पालनहार
तुला आमचा नमस्कार
प्रत्येकास जपतो तू विश्वंभर
तुझ्यात आयुष्याचा खरा क्षार
