STORYMIRROR

Priyanka Kute

Romance Fantasy

2  

Priyanka Kute

Romance Fantasy

बेधुंद सरी

बेधुंद सरी

1 min
9

प्रीत बसली तुझ्यावरी

नजर तुझ्यावर प्रेम वर्षाव करी

तू भरलास मन दरबारी

साक्षीला आहेत या बेधुंद सरी


प्रीत माझी बावरी

साद देते तुला हर बारी

तुला न पाहता जेव्हा दिनू ओसरी

मन भरून आणतात या बेधुंद सरी


मी तुझी राधा तू माझा हरी

मंत्रमुग्ध करते तुझी बासरी

तुझ्या प्रीतीची मला केव्हातरी

देती आठवण या बेधुंद सरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance