प्रेम वेडा
प्रेम वेडा
आज तुझ्या नयनांनी घायाळ केले मज
काय सांगू माझी प्रेमदशा ग लाडके तुज
पाहता तुला भान न राहिले
मन माझे तुझ्यात वाहिले....
अडकावे तुझ्या बंधनात
हेच आहे आता मात्र मनात
तुझ्या शी बोलता रोज
जणू होत असे नवा साज.......
रोजचे हे बोलणे
जसे रोज नव्याने गुंतणे
कधी न जावो हा क्षण
राहू दे सोबतीला तुझ्या माझे मन.....