भार (दर्पण रचना)
भार (दर्पण रचना)
भार
घ्यावा खांदयावर
भार
मानू नये कधी आपल्यावर
भार
हसत खेळत घेता हलका वाटे समजल्यावर
भार
आयुष्याचा वाटू नये, वाहू नये, जगू नये रडगाण्यावर
भार
उचलण्यास मिळाला कोणी नाही म्हणून नये कधी प्रेम करावे जगण्यावर
भार
