भाज्यांची सभा
भाज्यांची सभा


भाज्यांची सभा भरली होती
सगळयांची नजर एकामेकाकडे पाहत होती
प्रस्ताव होता नवीन अध्यक्ष्य निवडायचं
जो तो त्या पदासाठी लढत होता
जो तो आपला पक्ष ठेवत होता
आपण कसे बरोबर समोरचा कसा चूक हे पटवून देत होता
रंगात आली होती सभा
आरोप प्रत्यारोपाने तो भाग गजबजला
हळूहळू माणसाच्या राजकारणाचा दिसू लागला तिथे धुरळा