बेधुंद या तिमिरातही..
बेधुंद या तिमिरातही..
जरा राहुटी, तुझी या हृदयातही.
पाहुदे जरा चेहरा, तुझा या डोळ्यातही..
सांजवेळ झाली आली, आता घाई जाण्याची.
थांब जरा रेंगाळू दे, प्रहर हा या दिवसातही..
श्रावले ओठही उद्या उद्याच्या, भूल थापांनी.
आज जरा प्राशू दे, डाळिंबी या ओठातही..
गुलाबी थंडी भरली, श्वासांना उब दे जरा.
उष्ण श्वासांची तटबंदी, तुटु दे या हातातही..
तुझ्यात विसरावे मी स्वतःला, तू ही स्वतःला विसरून जा.
स्वप्नांचे इमले मिळवू सारे, बेधुंद या तिमिरातही..

