STORYMIRROR

Suhas Bokare

Abstract Tragedy

3  

Suhas Bokare

Abstract Tragedy

बदलते रंग

बदलते रंग

1 min
240

ते प्रेमाचे काचघर छिन्न नि छिन्न झाले अगदी.

दृक बदलताच रंगच तूझे, विभिन्न झाले अगदी.


किती भावना रंगविल्यात, तरंगविल्या मनात.

दुःखच क्षणात ह्रदयी झुरले, नि खिन्न झाले अगदी.


मांडलीस तू तूच खुशीने, दुःखाची गं थट्टा.   

सुख दुःखाचे अंगअंग ते, अभिन्न झाले अगदी.


विरह कथेचा मेघ मी नभी नि दूत आहे काळा.

माझ्या कथेत अंत आगळे नि भिन्न झाले अगदी.


काय म्हणू मी, तूझे ते गं दगडाचे मन आहे?

शिल्प स्वरूपी, प्रेम तेथील, विछिन्न झाले अगदी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract