बदलते 'मी'
बदलते 'मी'
'मी', 'मी' च्या विळख्यात गुरफटलेले 'मी'
करोनाकाळात नमते 'मी'तला 'मी'पणा
परिस्थिती बिकट होताच हतबल 'मी'
लढण्यास दुर्बल 'मी'!
वाकते, झिडकारते 'मी', 'मी'चा ताज!
बदलते हळूहळू जगण्या बळ देण्यास!
येतात समोर कोणी 'आम्ही'
हळूच नकळत हात त्यांच्या हातात गुंततात!
बदलते 'मी'चे 'मी'पण
'आम्ही'त बदलतांना
कष्ट मनाला पडले समजवतांना
विश्वासाने त्या 'मी'ला घेतले घट्ट मीठीत
'आम्ही'त बदलतांना!
परीस स्पर्श स्वःचा झाला
'मी'पणा गळला
'आम्ही'पणा स्विकारण्यास
पाऊल पडले पुढे!
करोनाकाळात बदलते 'मी'पणाचा मिजास
स्विकारण्या 'आम्हीपणा बदलते 'मी'!
