बदलता हिवाळा...
बदलता हिवाळा...
बदलता हिवाळा, पाडताे खूप थंडी,
अंगावर कायमच, स्वेटरची घालावी बंडी
बदलता हिवाळा, आजारांना निमंत्रण,
कसे करावे याचे, हाेत नाही नियंत्रण
बदलता हिवाळा, पाऊसही पाडताे,
पिकांवर गारपीट, धुक्याची चादर ओढताे
बदलता हिवाळा, त्रास खूप देताे,
ऋतूचे आता 'हिवसाळा', नामकरण करताे.
