STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Tragedy

4  

Mahesh Raikhelkar

Tragedy

बापू

बापू

1 min
167

बापू! तुमचा 'अहिंसेचा' मंत्र आम्हाला रुचला नाही

पण हिंसेनंही कुठले प्रश्न सुटतील असे आता वाटत नाही !

 

बापू ! तुमचे 'खेडयाकडे चला' हे म्हणणे आम्हाला पटले नाही

पण आता रोजच पहातोय शहराचे मरण अगतिकपणे !


बापू ! तुमची 'स्वदेशीची' चळवळ आम्हाला भावली नाही

पण आता विदेशी वस्तू वापरता वापरता आत्मादेखील गेलाय विदेशी होवून !


बापू ! तुमचा 'स्वच्छतेचा' वसा कधी आम्ही घेतलाच नाही

पण आता घाणीच्या साम्राज्यात जीव जातोय गुदमरून


बापू ! तुमची 'साधी राहणी' आम्ही कधी अंगीकारलीच नाही

पण आता पटतंय फक्त उच्च राहणीमानाने व्यक्तिमत्व खुलत नाही !


बापू! तुमचा 'स्वावलंबनाचा' मंत्र कधी आम्हाला आवडला नाही

पण आता समजून येतंय परावलंबनातलं गुलामपणं !


बापू! हा देश 'बापूचा देश' म्हणून जगात ओळखला जातोय

पण आम्ही करंटे मात्र फक्त तुम्हाला नोटांमध्येच पहातोय!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy