बाप्पा माझे आले...
बाप्पा माझे आले...
गणपती बाप्पा आले,
स्वागत करू या सारे,
कोरोनाला हरवण्यास,
बाप्पा माझे आले.
गणपती बाप्पा आले,
त्यांना पुजू या सारे,
कोरोनापासून वाचवण्यास,
बाप्पा माझे आले.
गणपती बाप्पा आले,
आरती करू या सारे,
दुःख भक्तांचे हरण्यास,
बाप्पा माझे आले.
गणपती बाप्पा आले,
कौतुक सर्वीकडे,
आनंद सर्वांना देण्यास,
बाप्पा माझे आले.
गणपती बाप्पा आले,
जयजयकार करू या सारे,
प्रसाद आनंदाचा देण्यास,
बाप्पा माझे आले.
गणपती बाप्पा मोरया,
विनवणी बाप्पाला करू या,
कोरोनाला हरवा बाप्पा,
गणपती बाप्पा मोरया
