बाप
बाप
बापाला कधी विसरू नको
झाला कितीही मोठा लेका,
तुझ्याच साठी त्याचा
वाजतोय प्रत्येक हृदयाचा ठोका!१!
रहावा तू सुखात म्हणून
तो रात्रंदिवस झिजतो,
रक्ताच करून पाणी
तुला प्रत्येक सुख पाजतो!२!
चुकला तू तर तोच
तुझ्यावर रागावतो,
व्हावे तुझे ध्येय पूर्ण
म्हणून स्वतःलाच जागवतो!३!
जरी तो होत नसेल
तुझ्या दुःखात सहभागी,
पण मिळावे तुला सारे सुख
म्हणून होतो साऱ्या गोष्टीचा त्यागी!४!
होऊन मोठा साहेब तूच
त्याला वेडा ठरवतो,
विसरू नको एवढीच सारी
अक्कल तोच तुझ्यात भरवतो!५!
तुला आज जर व्हायला
लागला जर बाप जड,
लक्षात ठेव त्यांनी एकट्याने
पोसले तुमचे सारे फड!६!
