बाप
बाप
मायेची हाक ऐकण्यास
तळमळीने आसूसणारा..
न दाखवता सगळ्यांवर
निष्पक्ष प्रेम करणारा ..
झोपलेल्या बाळाला
प्रेमाने गोंजारणारा ..
पाहिजे त्यापेक्षा जास्त
न सांगताही पुरवणारा ..
लेकरांच्या डोळ्यात पाणी
कधीच न येऊ देणारा ..
दुःख आपले मनातच
बाळगून लपवणारा ..
घराला संस्काराची शिस्त
कठोरतेने लावणारा ..
सगळ्या कुटुंबाचा खरा
आधार म्हणजे बाप !