STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

बाप

बाप

1 min
239

बाप सुखाचा सागर 

बाप दु:खात आधार 

चिंता मिटते त्याच्या 

राबणार्या कष्टावर 


बाप उद्याचे भविष्य 

बाप जीवनाचा आकार 

त्याच्या शब्दामुळे जगात 

 मिळते पोटाला भाकर 


बाप नाही टाकाऊ 

बाप आयुष्याचे छत्र 

अपमान सतत गिळतो  

निर्मळ मन पाण्यासमान पवित्र 


दु:ख नाही तो सांगत 

यातना स्व:ता सोसतो 

कुटुंबाच्या सुखासाठी 

रक्त त्याचे आटवितो 

 

त्याचे रडणे आतले 

नाही कुणाला दिसत 

जीव त्याचा हळवा 

अश्रू नाही तो ढाळत 


पापाचा तोच धनी 

नाही घेत वाटेकरी 

तरी कुटूंबाला जपतो 

त्याच्या तळ हातावरी 


त्रास, संघर्ष माथी 

त्याची जीवन रहाटी 

मायाजाळात गुंतते 

त्याची हृदयाची नाती 


राग येतो भरपूर 

त्यात प्रेम ओतपोत 

कुटूंबाची त्यास चिंता 

वेध भविष्याचे त्यात 


बाप जीव जाळतो 

बाप मन जाळतो 

इच्छा मुलांच्या जपण्यास 

जीवन साधेसुधेच जगतो 

 

ज्याने जग दाखविले 

त्या बापाचा महिमा थोर 

किती सांभाळले सुखात 

फिटणार नाही उपकार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational