STORYMIRROR

vanita shinde

Inspirational

3  

vanita shinde

Inspirational

बाप

बाप

1 min
11.5K

बाप म्हणा किंवा पिता

तोच आहे जन्मदाता

चरणी टेकते माथा

पायाशी सर्वकाळ..


राबतो गाळूनी घाम

कष्टाने मिळवी दाम

कामातच दिसे राम

सदैव माझ्या बापा..


बाप माझा कष्टकरी

देतो पोटाला भाकरी

आधाराचे छत्र शिरी

धरतो फिकीरीने..


घरावरील अरिष्ट

करतो तोच रे नष्ट

सांभाळ करी उक्तृष्ट

आपल्या प्रपंचाचा.


छाती संकटे झेलुनी

केले रक्ताचे रे पाणी

सुख दिधले जीवनी

आपल्या कुटुंबाच्या.


रडण्याची ना उसंत

नाही करत तो खंत

फुलवितो रे वसंत

जीवनात सा-यांच्या.


मनी त्याच्या स्वाभिमान

वाटे मला अभिमान

सदा ठेवीन सन्मान

जीवनात बापाचा.


बाप आहे माझा गुणी

मानते मी देवस्थानी

आदर वाटतो मनी

पुजनिय पित्याचा.


ऋण फिटणार नाही

पुन्हा मिळणार नाही

दिशा फिरल्यास दाही

असा रे बाप माझा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational