STORYMIRROR

Nalanda Satish

Tragedy

4  

Nalanda Satish

Tragedy

बाप माझा शेतकरी

बाप माझा शेतकरी

1 min
186

बाप माझा शेतकरी

शेतात राबतो

भुईवर धान्य पिकवितो

समस्तांना अन्न खाऊ घालतो


बाप माझा शेतकरी

सर्वांना पोसतो

करुनी काबाडकष्ट शेतात

काळ्या मातीतून सोनं उगवतो


बाप माझा शेतकरी

प्रामाणिक माणूस

लाचलुबाड़ी दूर सारतो

निर्जीव बियांमधुनी रान फुलवितो


बाप माझा शेतकरी

अन्नदाता आमचा

कर्जात बुडून गेला

कर्जमाफीचा अर्ज कचऱ्यात गेला


बाप माझा शेतकरी

खातो शिळेपारथे

पोटाला चिमटा लेकराचा

समर्थनमूल्याचा विचार नाही सरकारचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy