STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy

4  

Umakant Kale

Tragedy

बाप माझा शेतकरी

बाप माझा शेतकरी

1 min
148

घाम गाळूनी राबतो

बाप माझा शेतकरी

कष्ट त्याचे नाही कमी

पिकवतो तो शिवारी


अंगी चिंध्या चिंध्या झाल्या

दैना कपड्यांची अशी

भोके चपलीला दिसे

जणू ती पुजली जसी


नाही पाहिले रे कधी

दु:ख मी ते सांगताना

रडे एकट्यात असा

बाप माझा झोपताना


किती संकटी डोंगरी

थाटून उभी राहिली

तीळ तीळ या सागरी

जगून ती रे पाहिली


वाटे मनी भिती अशी

कधी तो हरला तर

कंटाळून जीव असा

देऊन बसला तर


सरकार उदासीन

देवा तूच आता तार

येथे जगू दे रे सारे

शेतकरी नाही भार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy