बालविधवा
बालविधवा
बाहुपाश म्हणजे काय रे
मज कळत नाही कृष्णा
मी तर बालविधवा
मज समजे ना तृष्णा
शृंगार म्हणजे काय रे
जे करून असते राधा
वेगळी का रे मम कांती
मज वेश का साधा
प्रेम म्हणजे काय रे
मज सांग ना मोहना
तुला ठाऊक आहे सारे
सांग कोठे रे सजना
मी इतकी खुळी कशी रे
मला काहीही समजे ना
एक अंधारी खोली ही
माझं सारं जग असते ना