STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Classics Fantasy Children

3  

Anjali Bhalshankar

Classics Fantasy Children

बालपणीची दुनिया..

बालपणीची दुनिया..

1 min
194

लहानपणीची दुनिया किती छान होती

वारयासम, चंचल हिरवळीसम, कोमल होती


वटवृक्षाच्या छायेत वाढणाऱ्या वेलीप्रमाणे,

कुटुंबाच्या आधाराने बहरत होती


नितळ पाण्याचा झरयासम, स्वच्छ फुलाफुलांवर

बागडणाऱ्या फुलपाखरासम नाजुक होती


पौर्णिमाच्या चंद्रासारखी शीतल प्रकाशाने

लुकलुकणार्‍या टिपूर चांदणयासम होती


लहानपणीची दुनिया खरंच भारी होती

तुझे माझे या शब्दापासून दूर आपली होती


निस्वार्थी मोकळं हसू प्रेम वात्सल्य

ही जगण्याची रीत होती


आईचा धपाटा, बाबाच्या नजरेला भिणारी,

हटट करून आजीला बिलगणारी होती


वय वाढत जाते बाहेरचे जग जवळ येते पंख पसरून

उत्तुंग आकाशाला कवेत घेताना

मदमस्त ऊनाडणारया पिलाला मग घरटे छोटे वाटू लागते


पैसा संपत्ती गाडी बंगला बँक बॅलन्स

या सोबत आई बापाची ही विभागणी होते


तुझे माझे कर्तव्य, जबाबदाऱ्या चे पाढे ऐकताना

जन्मदात्यांचेही जगणे लाचार होऊन जाते

कधी कधी वाटते नकोच व्हायला होते

मोठे हळवे निरागस निस्वार्थी बालपण तेव्हा बरे होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics