बालपणाचा काळ सुखाचा?
बालपणाचा काळ सुखाचा?
बालपणाचा काळ सुखाचा कुणी कवी
म्हणाला लेखणीतून बालपण आठवुनी
रम्य बालपण असते कां सर्वांच्या नशिबी!
कष्ट उपसले त्यास वाटे नको त्या आठवणी
साधे सरळ जीवन जगावे वाटे सगळ्यांना
जरी वाटले तरी,अशा जगण्याला अर्थ नाही
जीवनात चढ - उतार असतात कमी जास्त
संघर्षांतुनी जीवन-वाट चालणे कमी नाही काही!
रामायण महाभारतातले राम -कृष्ण आपले
त्यांच्या संघर्षावर मात करूनच महान ठरले
देव-देवतांनाही चुकला नाही संघर्ष दानवाशी
मग मानवाचे संघर्षाविना जगणे ते कसले?
सोने -चांदी देखील अग्निदिव्यातून गेल्यावरच
बनतात कला-कौशल्याचे अप्रतिम दागिने छान
दगडालाही टाकीचे घाव सतत सहन केल्यावर
त्यातून बनते शुभक सुंदर देवळातला देव महान
पशू-पक्षी,वनस्पती, तसेच सजीव, प्राण्यांना
वा र्निजीवाना ही कधी संघर्ष नाही चुकला
मग, भूवर राहणारा सामान्य माणूस आपण
त्या संघर्ष प्रतिकाराविना कसा काय सुटला !
कुणाचा जीवन संघर्ष तर पाचविलाच पुजलेला
जरी रम्य ते बालपण सगळेच आता म्हणतात
पण संघर्षांना लहानपणापासून तोंड देणाऱ्यास
मात्र वाटत असते नको त्या आठवणी वाटतात
