बाल कामगार
बाल कामगार
तुझ्या पाठीवरचं ओझं
पुस्तकाचं की त्या काँक्रेटच्या मसाल्याचं
याचं समीकरण
अजुन कुठल्याच शाळेत सुटलं नाही
तुझ्या नाजूक
हातातल्या खेळण्यात
मातीच्या विटा
केव्हा आल्या कळलच नाही
तुझ्या निष्पाप जीवावर
होतं राजकारण,
समाजकारण
पण तुझ्या दारिद्रीचा लढा सुटतच नाही
बाल कामगार म्हणुन
थांबवले जाते तुझे हात
कुठल्याच योजनेचा पुरावा मात्र
तुझ्यापर्यंत पोचतच नाही