धागा...
धागा...
प्रिय धागा..
दंग झालोय
बघुन तुझं कौशल्य
बघितलं तुझं नातं लपलेलं कॉटोनमध्ये
आईच्या साडीमध्ये
बाबाच्या गंजीमध्ये
ताईच्या ओढणीमध्ये
भावाच्या शर्टामध्ये
विनकराच्या वस्त्रामध्ये
मित्राच्या नात्यामध्ये
बघितलं तुझं नातं लपलेलं कॉटोनमध्ये
जेव्हा तु तुकड्यांना जोडतोस
निशब्द होऊन जातोय
कुठुन शिकलास रे एवढा निरागसपणा
नाही गर्व कुठलाच
नाही स्वार्थ कुठलाच
अन् दिसतही नाही तु कुठल्याच अपेक्षेमध्ये
बघितलं तुझं नातं लपलेलं कॉटोनमध्ये
तुटलेल्या नात्याला जोडण्याचं
तुच एकमेव उदाहरण आहेस
मानवी नात्याला दिसतील अनेक गाठी
पण दिसतो फक्त सरळपणा तुझ्या वागण्यामध्ये
बघितलं तुझं नातं लपलेलं कॉटोनमध्ये
तु चालतच राहतो पुढे
धाग्यामध्ये धागा गुंफुन
मीही विणू पाहिलं होतं एकदाच
एका नात्याचं वस्त्र
एका विश्वासाच्या नात्यामध्ये
बघितलं तुझं नातं लपलेलं कॉटोनमध्ये
माझ्याही नात्यातल्या
दिसताहेत साऱ्या स्पष्ट गाठी
धागा तु आहेस मनाच्या आपुलकीचा
सोबती दुःखाचा अन् सुखामध्ये
बघितलं तुझं नातं लपलेलं कॉटोनमध्ये