ओठांनी न बोलणारे
ओठांनी न बोलणारे




ओठांनी न बोलणारे व्यक्ती
डोळ्यांनी बरंच काही सांगुन जातात
मनातील असलेलं गुपित
अलगदपणे सुचवून जातात
असतो विरह नयन पापणीत
हसुन सहज भुलवून जातात
लागता ठेच मनाला
स्वतःलाच एकट्यात रडवून जातात
जपतात आयुष्यभर प्रेमाचं नातं
दुसऱ्याला आपुलकी दान देऊन जातात