प्रेम
प्रेम

1 min

35
व्याकरणात चुकलात
तरी प्रेम करता येतं.!
कॉन्व्हेन्ट मध्ये शिकलात
तरी प्रेम करता येतं.!
सोळा वर्षे सरली
तरी प्रेम करता येतं.!
पंचेहत्तरा नंतरही
प्रेम करता येतं.!
प्रेमात मन हळवं होतं
प्रेमात पडल्याशिवाय ते कळत नसतं.!
प्रेम कोणावरही करता येतं
त्याला काही अपवाद नसतं.!
प्रेम स्वतःवरही करता येतं
प्रेम काही मर्यादित नसतं.!
प्रेम बिन झुठ नसतं
प्रेम फक्त प्रेम असतं.!