पाऊस, छत्री अन् 'ती'
पाऊस, छत्री अन् 'ती'


पाऊस आला छत्री भिजली
छत्रीमध्ये ती दिसली..!
ओल्या कविता सुचू लागल्या
सरी पाण्याच्या नाचू लागल्या..!
गारवा गार वाहू लागला
भिजलेलं अंग वाचू लागल्या..!
माझ्या मनातील एकांत बोलू लागला
तिच्या मस्तीत डोलू लागला..!
पावसाचा ओलावा टिकला नाही..!
माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचल्या नाही..!
शेवटी, अनोळखी तिला मी कळलो नाही
पावसात ती अन् छत्री रुचली नाही..!